Mon, Nov 19, 2018 04:45होमपेज › Satara › दूध दरवाढीसाठी कराडमध्ये बळीराजाचा मोर्चा

दूध दरवाढीसाठी कराडमध्ये बळीराजाचा मोर्चा

Published On: Dec 26 2017 3:03PM | Last Updated: Dec 26 2017 3:03PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूधाला उत्पादन खर्चावर हमीभाव मिळावा व कर्नाटक राज्याप्रमाणे प्रति लिटर थेट अनुदान मिळावे या  मागण्यासाठी मंगळवारी कराड येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील व सातारा जिल्हा अध्यक्ष साजिद मुल्ला यांनी केले.

दुपारी बारा वाजता येथील कोल्हापूरनाका परिसरातून मोर्चा सुरू झाला. कराड शहर पोलिस मार्गे दत्त चौक, भेदा चौक, असा पुढे तहसील कार्यालयाकडे गेला. त्याठिकाणी प्रमुख मान्यवरांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन आंदोलकांच्या शिष्ट मंडळाने तहसीलदार यांना दिले.