Sat, Apr 20, 2019 08:28होमपेज › Satara › सातारा : शेततळ्यात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

सातारा : शेततळ्यात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

Published On: Dec 16 2017 5:16PM | Last Updated: Dec 16 2017 5:16PM

बुकमार्क करा

ओझर्डे : वार्ताहर 

वाई तालुक्यातील सटालेवाडी येथे शेतकर्‍याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. पाय घसरून स्‍वत:च्या मालकीच्या शेततळ्यात पडल्याने शनिवारी ही घटना घडली. संदीप लक्ष्‍मण वाडकर (३५) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. 

संदीप यांचे खिंडाचा माळ हद्दीत स्वता:च्या मालकीची जमीन आहे. त्या ठिकाणी त्यांनी शेततळे खोदले आहे. शेततळ्यात जोडधंदा म्‍हणून त्यांनी मत्‍स्यपालन सुरू केले होते. या माशांना खाद्य टाकण्यासाठी ते दररोज शेततळ्यावर जायचे. आज सकाळी ते खाद्य टाकण्यासाठी गेले असता शेत तळ्याच्या काठावरुन त्यांचा तोल गेल्याने ते पाय घसरून शेततळ्यात कोसळले. यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला.