Mon, Nov 19, 2018 06:22होमपेज › Satara › कराड : कालवडे येथे शेतमजूराचा मृत्यू; खून झाल्याचा संशय

कराड : कालवडे येथे शेतमजूराचा मृत्यू; खून झाल्याचा संशय

Published On: Jan 05 2018 3:03PM | Last Updated: Jan 05 2018 3:03PM

बुकमार्क करा
कराड : प्रतिनिधी

कराड तालुक्यातील कालवडे येथे शेतमजूराचा मृतदेह आढळून आला. प्रथमदर्शनी त्याचा खून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. बबन हिंदुराव गाडे (वय ५०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गावाजवळील रुक्मिणी खिंड परिसरात संबधित व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी नवनात ढवळे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.