Thu, Apr 25, 2019 18:01होमपेज › Satara › पुण्यातील गुंडाचा साथीदारांनीच केला गेम

पुण्यातील गुंडाचा साथीदारांनीच केला गेम

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 10:44PM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी हद्दीत तातमगिरी रस्त्याच्या बाजूला आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, संबंधित युवक काळेवाडी (पुणे) येथील गुंड असून सचिन ठाकूर असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. फलटण येथील कोर्टात साथीदाराच्या तारखेसाठी आल्यानंतर त्याच्याच साथीदारांनी दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी 6 सशंयितांना अटक झाली आहे. 

मृत संबंधित युवकाचे नाव सचिन विश्‍वनाथ ठाकूर (वय 19, रा. काळेवाडी, पुणे, मूळ रा. बिदर, कर्नाटक) असल्याचे निष्पन्न झाले आहे. मारेकर्‍यांपैकी प्रकाश ओंबासे याची फलटण कोर्टात तारीख होती. त्यामुळे सचिन ठाकूर व अन्य साथीदार ओंबासेबरोबर गेले होते. बरड गावच्या हद्दीत गेल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यातून चौघा जणांनी सचिनच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली व मृतदेह तातमगिरी रस्त्याकडेला फेकून सर्व जण पसार झाले होते. याप्रकरणी प्रकाश ऊर्फ फाक्या ओंबासे (रा. काळेवाडी), सतीश ऊर्फ बंड्या सगर, प्रशांत दिघे (रा. भूगाव, ता. मुळशी, जि. पुणे), कलीम शेख (रा. चिखली, पुणे), वैभव नाझीरकर (रा. काळेवाडी, पुणे), सुशांत शिंदे (रा. काळेवाडी, पुणे) यांना अटक करण्यात आली असून एक स्विफ्ट कारही जप्त केली आहे. तसेच फलटण ग्रामीणचे भगवान बुरसे व आर. आर. भोळ हे पुणे येथील पोलिस ठाण्यात गेले आहेत, तर सोमवारी रात्री सातारा गुन्हे शाखेचे पोलिस काळेवाडी, राहाटणी येथे चौकशीसाठी गेले होते.