Sat, Jul 20, 2019 08:56होमपेज › Satara › फलटणमध्ये बँक कर्मचार्‍याची आत्महत्या

फलटणमध्ये बँक कर्मचार्‍याची आत्महत्या

Published On: Feb 04 2018 11:22PM | Last Updated: Feb 04 2018 11:17PMफलटण : प्रतिनिधी

येथील बँकेत नोकरी करणार्‍या नीलेश हरिभाऊ शिंदे या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेबाबत शहरामध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

शनिवारी नीलेश शिंदे हे कोणालाही न सांगता घराबाहेर गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने शोधाशोध केली असता त्यांच्याच शेतामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर त्यांचा मृतदेह रात्री उशिरा फलटण उपजिल्हा रुग्णालयात आणला होता.  शिंदे यांनी नेमकी का आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही.दरम्यान, नीलेश शिंदे हे फलटणमधीलच आयसीआयसीआय बँकेत नोकरीस होते.