Thu, Sep 20, 2018 08:02होमपेज › Satara › अलगुडेवाडी बाह्यवळण रस्त्याची मोजणी ग्रामस्थांनी बंद पाडली

अलगुडेवाडी बाह्यवळण रस्त्याची मोजणी ग्रामस्थांनी बंद पाडली

Published On: Dec 21 2017 6:59PM | Last Updated: Dec 21 2017 6:59PM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

तेवीस फाटा - अलगुडेवाडी (बारामती रोड) येथून जाणार्‍या बाह्यवळण रस्त्यास ग्रामस्थांनी विरोध केला असून, रस्त्याच्या मोजणीचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले. यावेळी एका शेतकर्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. 

बोरावके वस्ती बारामती रोड येथून सुरू होणार्‍या व पुढे अलगुडेवाडी, धुळदेव, विडणी, सोनवडी, कोळकी, झिरपवाडीनंतर दहिवडी रस्त्यास मिळणार्‍या राज्य मार्ग 117 ते 149 यास जोडणार्‍या बाह्यवळण रस्त्याची मोजणी सुरू आहे. गुरुवारी अलगुडेवाडी ग्रामस्थांनी आपणास विश्‍वासात न घेता एकतर्फी मोजणी सुरू असल्याचा आरोप करत मोजणी बंद पाडली. यावेळी मोजणी करणार्‍या एजन्सीने जबरदस्ती रस्ता मोजण्याचा प्रयत्न केला असता, एका शेतकर्‍याने कीटकनाशके पिण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर शेतकर्‍यांनी वेळीच त्यास रोखले यामुळे या ठिकानी तणाव निर्माण झाला होता.