Sat, Nov 17, 2018 03:41होमपेज › Satara › सातारा : खटाव येथे अडीच एकर ऊस जळून खाक(व्हिडिओ)

सातारा : खटाव येथे अडीच एकर ऊस जळून खाक(व्हिडिओ)

Published On: Dec 23 2017 8:35PM | Last Updated: Dec 23 2017 8:35PM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी 

खटाव तेथील शेतकरी किशोर डंगारे यांच्या ऊसाच्या फडाला विजेच्या तारांमधे स्पारकिंग झाल्याने आग लागली. आगीत अडीच एकर ऊस आणि ठिबक असे एकूण सहा लाखांचे नुकसान झाले. 

डंगारे वस्तीवर किशोर डंगारे यांची शेती आहे. शनिवारी  शेतातून गेलेल्या विजेच्या तारांमध्ये स्पारकिंग झाल्याने डंगारे यांच्या ऊसाच्या फडाला आग लागली. त्यांच्या डोळ्यादेखत आगीने रौद्र रुप धारण केले. जोराचा वारा असल्याने लागलेली आग अडिच एकरात पसरली. ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात पसरलेला ठिबक सिंचन आगीत जळून खाक झाल्याने डंगारे यांचे सहा लाखांचे नुकसान झाले.