Mon, Jun 24, 2019 16:38होमपेज › Satara › सातारा : भिडे गुरूजींच्या मोर्चाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट

सातारा : भिडे गुरूजींच्या मोर्चाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरूजींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे गुरूजींच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे यामागणीसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या हजारो धारकऱ्यांनी साताऱ्यासह अन्य राज्यात बुधवारी २८ मार्च रोजी मोर्चे काढण्यात आले. यामोर्चासंबंधी कराडच्या तरूणाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याने त्याच्याविरोधात कराड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या हजारो धारकऱ्यांनी कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधातील गुन्हे मागे घ्यावेत यामागणीसाठी भिडे गुरूजीे सन्मानार्थ साताऱ्यासह अन्य राज्यात बुधवारी २८ मार्च रोजी मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चासंबंधी ओंड (ता. कराड) येथील सागर बबन शेवाळे (रा. तुळसण फाटा, ओंड) या तरूणाने  भिडे गुरूजींच्या छायाचित्राचा वापर करत एक आक्षेपार्ह पोस्ट आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केली होती.

भिडे गुरूजीेच्या विरोधातील आक्षेपार्ह पोस्ट पाहताच कराडमधील सागर जयसिंगराव आमले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.  या तक्रारीनुसार संबंधीतावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

Tags : satara, satara news, karad crime, Bhide Guruji, protest, Bhima Koregaon, facebook ,


  •