Sun, Jul 21, 2019 07:59होमपेज › Satara › मुख्यमंत्री मर्जीतले लोक नेमून क्लिन चिट देतात : पृथ्वीराज चव्हाण

CM मर्जीतले लोक नेमून क्लिन चिट देतात : चव्हाण

Published On: May 11 2018 3:08PM | Last Updated: May 11 2018 3:08PMकराड : प्रतिनिधी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत. चौकशीचे नाटक केले जाते आणि लोक विसरले की मुख्यमंत्री त्यांना क्लिन चीट देतात. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तरी दिली जात नाही. माझ्यासारख्या एका माजी मुख्यमंत्र्याला माहिती दिली जात नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना काय दिली जाणार? असा प्रश्न उपस्थित करत याप्रश्नी न्यायालयात धाव घेण्याची विनंती आपण पक्षाकडे केल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

राज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. निवृत्त न्यायाधिशाकडून चौकशी करण्याची आमची मागणी असताना तसे केले जात नाही. आपल्याच मर्जीतील माणसे नेमायची आणि चौकशी करायची. पुढे लोक विसरले की मंत्र्यांना क्लिन चीट द्यायची, अशी मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती मागितली असता, ती माहितीही दिली जात नाही, असा दावा करत याप्रश्नी आपण पक्षाला न्यायालयात धाव घ्यावी, अशी विनंती केल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Tags : satara, satara news, ex chef minister of Maharashtra,  prithviraj chavan,  CM devendra phadanvis,investigate corruption charges, clean chit, favourable officers