Tue, Apr 23, 2019 06:02होमपेज › Satara › सातारा : विजेचा धक्‍का लागून दोन वायरमन गंभीर 

सातारा : विजेचा धक्‍का लागून दोन वायरमन गंभीर 

Published On: Jul 31 2018 4:13PM | Last Updated: Jul 31 2018 4:13PMखेड : वार्ताहर

सातारा येथील वीज वितरण कंपनीच्या पोवई नाका शाखा नं. २ येथील दोन वायरमनना  विद्युत फिडरवरील हायहोल्टेज विजेचा धक्‍का लागून गंभीर जखमी झाले आहेत. एकनाथ विठ्ठल शिंदे (वय ३० रा. दरे ता. कोरेगाव) व महावीर भरत गुरव (वय २७, रा. सातारारोड ता. कोरेगाव) अशी जखमी वायरमन यांची नावे आहेत. 

मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता महामार्गा नजिकच्या खेड हद्दीतील हॉटेल महिंद्रा परिसरात वीज वितरण कंपनीची दैनंदिन कामे सुरू होते .त्यावेळी शिंदे व गुरव हे वायरमन विद्युत खांबावर चढले होते. अचानक फिडर सप्लायवरील वीज वाहिनीला त्यांचा हात लागल्याने विजेचा जोरदार शॉक लागला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. शिंदे यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असुन ते १६ टक्के तर गुरव १५ टक्के भाजलेले आहेत. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.