Tue, Jul 23, 2019 17:01होमपेज › Satara › कोरेगाव : भाकरवाडीच्या अंध विद्यालयात वीज चोरी (व्‍हिडिओ)

कोरेगाव : भाकरवाडीच्या अंध विद्यालयात वीज चोरी (व्‍हिडिओ)

Published On: Dec 12 2017 9:26PM | Last Updated: Dec 12 2017 9:21PM

बुकमार्क करा

कोरेगाव : प्रतिनिधी 

भाकरवाडी, (ता. कोरेगाव) येथील प्रबोधन निवासी अंध विद्यालय प्रशिक्षण संस्थेतील वीज चोरी उघडकीस आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. याबाबत कोरेगावच्या उपकार्यकारी अभियंता अर्चना पांढरे यांनी छापा टाकून कारवाई केली. 

प्रबोधन निवासी अंध विद्यालय प्रशिक्षण संस्थेत वीज चोरी सुरू असल्याची गोपनीय माहिती वीज मंडळाच्या कार्यालयाला मिळाली होती मात्र, समाजातीला गरजू व उपेक्षित अंध मुलांच्या शाळेतील हा संवेदनशील विषय असल्याने याबाबतची माहिती सातारा मुख्यालयातील अधीक्षक अभियंता संजय साळीकर व कार्यकारी अभियंता सुनिल माने यांना देण्यात आली. त्यानंतर वीज चोरीबाबतची खातरजमा करण्यात आली. उपकार्यकारी अभियंता अर्चना पांढरे व कोरेगाव उपविभागाचे जगदाळे यांच्यासह कर्मचारी व  दोन शासकीय पंच यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी तेथे महावितरण कंपनीच्या विद्युत वाहिनीच्या तारेवर निळ्या रंगाच्या दोन वायरचा आकडा टाकून बेकायदा  वीज चोरी सुरु असल्याचे आढळून आले. कारवाई पथकाने दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत वीज चोरीचा रितसर पंचनामा केला. त्यानंतर या संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.