Sun, Jul 21, 2019 08:27होमपेज › Satara › साताऱ्यात आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून

साताऱ्यात आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून

Published On: Mar 23 2018 7:28PM | Last Updated: Mar 23 2018 10:51PMखटाव (सातारा) : प्रतिनिधी

नेर ( ता. खटाव ) येथील दुसरीत शिकणाऱ्या क्रांती विजय शिर्के या आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. तिचा मृतदेह आज (गुरूवार दि 23 मार्च) गावाशेजारीलच विहीरीत आढळून आला. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविछेदन केल्यानंतर क्रांतीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

याबाबत अधिक माहिती अशी. नेर येथील क्रांती शिर्के ही मुलगी बुधवारी (दि. 21 मार्च) सायंकाळी पाच वाजता घरासमोर खेळताना अचानक बेपत्ता झाली होती. बुधवारी रात्रभर शिर्के कुटुंब आणि गावकऱ्यांनी तीचा शोध घेतला मात्र क्रांती शोध लागला नव्हता. आज (शुक्रवार दि 23 मार्च) सकाळी 11 वाजता तीचा मृतदेह नेर धरणाच्या शेजारील विहीरीत आढळून आला. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात क्रांतीवर शवविछेदन करण्यात आले. शवविछेदन अहवालात क्रांतीचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संभाजीराव गायकवाड करत आहेत.

Tags : satara, satara news, ner khatav, shirke murder case,