Tue, May 30, 2017 04:07
29°C
  Breaking News  


होमपेज › Satara › कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के 

कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के 

By pudhari | Publish Date: May 20 2017 12:15AM


कराड : वार्ताहर  
कोयना धरण परिसरात शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे ३ रिश्टर स्केलचे सौम्य धक्के बसले. ढेबेवाडी गावा नजीक या भूकंपाचे केंद्र असल्याचे समजते.  यात कोणतीही जीवितहानी झाली असून भूकंपामुळे मात्र परिसरात भीतीचे वातावरण होते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि संगमेश्वरच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.