Tue, Nov 13, 2018 01:26होमपेज › Satara › सातारा : बनावट मोबाईलची विक्री करणाऱ्याला अटक

सातारा : बनावट मोबाईलची विक्री करणाऱ्याला अटक

Published On: Feb 22 2018 3:04PM | Last Updated: Feb 22 2018 2:55PMसातारा : प्रतिनिधी

ब्रँडेड वस्तूच्या नावाखाली व गरज असल्याचे खोटे सांगून चक्क बनावट मोबाईल विक्री करणार्‍या जळगाव येथील युवकाला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण व सायबर सेल विभागाने अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाईलसह ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या पाठीमागे मोठी टोळी असण्याची शक्यता असून पोलिस तपास करत आहेत.

सुनील चिंतामन जाधव (वय २२, रा. दापोरी जि. जळगाव) असे अटक केलेल्या संशयित युवकाचे नाव आहे. दरम्यान, बनावट वस्तूंचा मार्केटमध्ये सुळसुळाट सुरु असून मोबाईलही बनावट असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अडचण असल्याचे सांगून कमी दरात फोनसह इतर वस्तू विक्री करणार्‍या टोळ्या कार्यरत असून याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.