Mon, May 20, 2019 08:25होमपेज › Satara › चालक, मालकाला मारहाण करून अज्ञातांनी ट्रकच पळवला

चालक, मालकाला मारहाण करून अज्ञातांनी ट्रकच पळवला

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 11:24PMफलटण : प्रतिनिधी

मोटारसायकलवरून येऊन रोख 8 हजार रुपये तसेच सिटच्या मागे ठेवलेले 40 हजार व दोन मोबाईल, आंब्याच्या पेटीसह भरलेला ट्रक तिघा अज्ञातांनी ट्रक मालक व चालकाला मारहाण करून चालकाच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देत पळवून नेला असल्याची घटना वडजल, ता. फलटण येथे घडली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडजल येथील हद्दीत मंगळवार, दि. 10 रोजी मध्यरात्री 1 च्या सुमारास श्रीनिवास कृष्णा शीनू (रा.एलबीनगर, गोगमहल (आंध्र प्रदेश) यांच्या मालकीचा टाटा ट्रक (नं. एपी02 टीई 2370) यामध्ये पिलेर आंध्र प्रदेश येथून आंब्याचे बॉक्स भरून फलटणमार्गे गुलटेकडी पुणे मार्केटयार्डकडे जात असताना फलटणकडून मोटारसायकलवरून येऊन तिघा अज्ञातांनी वडजल गावच्या हद्दीत फलटण पुणे रस्त्यावर ट्रक अडवून ट्रक चालक व मालकाला मारहाण करुन चालकाच्या गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत तो पळवून नेला. त्यांची मोटारसायकल त्यांनी तिथेच सोडून दिली.

चालकाच्या खिशातील 8 हजार रुपये रोख व दोन मोबाईल, आंब्याचे बॉक्स, ट्रक्समध्ये चालकाच्या मागील बाजूस सिटखाली मालकाने ठेवलेले 40 हजार घेऊन हा ट्रक चांदणी चौकात सोडून देऊन हे तिघे तेथून निघून गेले. ट्रक मालकाने या घटनेची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्या नंतर तिघा अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान आरोपींच्या शोधासाठी पथके नियुक्त करून तपास सुरू आहे. अधिक तपास सहा. पोलिस निरिक्षक नागटिळे करीत आहेत.