Tue, Aug 20, 2019 04:24होमपेज › Satara › डॉ. येळगावकर यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली : सुरेंद्र गुदगे 

डॉ. येळगावकर यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली : सुरेंद्र गुदगे 

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 10:36PMमायणी  : वार्ताहर

गत जिल्हा परिषद निवडणुकीत कलेढोण भागातील शेतकर्‍यांना एका महिन्यात शेतीचे पाणी आणून दाखवतो, अशी वल्गना करणार्‍या डॉ.येळगावकरांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केला. 

तरसवाडी स्मशानभूमीशेड कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.यावेळी दादासो कचरे, मायणी अर्बन बँकेचे संचालक सुर्यकांत तरसे, सरपंच बाबुराव कदम, उपसरपंच विक्रम पवार , सोसायटी चेअरमन महादेव पवार, मधुकर तरसे,सुभाष पवार आदी उपस्थित होते. गुदगे म्हणाले, टेंभू योजनेतून खटाव तालुक्यातील चितळी व म्हासुर्णे भागातील केवळ काही हेक्टर शेतीलाच फायदा होतो. त्यात कलेढोणपूर्व भागाचा अथवा मायणीचा समावेश नाही. कै. भाऊसाहेब गुदगेंनी गावात नाला बल्डींग व पाझर तलावाची कामे उभी केली. तोच वारसा पुढे चालवून आपण सिमेंट बंधारे बांधणी, पाझरतलाव दुरुस्ती आदी कामे जिल्हा परिषदेच्या व जिल्हा नियोजन मंडळातून करण्याचे अभिवचनही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विनायक तरसे, जगदीश पवार, रामचंद्र पवार, सुखदेव पवार, साहेबराव तरसे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन शामराव तरसे यांनी केले.