Tue, Jan 22, 2019 20:02होमपेज › Satara › ढेबेवाडीत ग्रामसेवकासह शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात

ढेबेवाडीत ग्रामसेवकासह शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात

Published On: Mar 25 2018 1:53AM | Last Updated: Mar 25 2018 12:12AMकराड  : प्रतिनिधी

विवाहाची नोंद करत त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी ताईगडेवाडी (ता. पाटण) येथील ग्रामसेवक पृथ्वीराज तुकाराम जाधव-पाटील याच्यासह शिपाई प्रदीप ऊर्फ पोपट एकनाथ करपे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.  लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सुहास नाडगौंडा यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक आरिफ मुल्ला, सहाय्यक फौजदार जयंत कुलकर्णी, आनंदराव सपकाळ, भरत शिंदे, संभाजी बनसोडे, शंभु सकपाळ, अजित कर्णे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई ताईगडेवाडी ते कुंभारगाव या मार्गावरील तिकाटणे परिसरात सापळा रचून केली आहे.

ग्रामसेवक पृथ्वीराज जाधव - पाटील (वय 52, मूळ रा. सुपने, ता. कराड. हल्ली रा. आगाशिवनगर, मलकापूर) हे ग्रामसेवक असून त्यांच्याकडे तक्रारदाराने विवाह नोंदणीच्या प्रमाणपत्राची मागणी केली होती. याबाबत 23 मार्चला संंबंधित तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर लाचलुचपत विभागाकडून पडताळणीही करण्यात आली होती. लाचेची रक्कम शिपाई प्रदीप उर्फ पोपट करपे (वय 39, रा. करपेवाडी) यांच्यामार्फत स्विकारण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी दोन्ही संशयितांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ढेबेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 

 

tags : dhebewadi,news,karad ,gramsevk,pone, arrested, for, taking ,bribe ,