Sun, Apr 21, 2019 04:40होमपेज › Satara › 'काँग्रेस-राष्ट्रवादीकडून यशवंतरावांच्या स्‍वप्‍नांना तिलांजली' (व्‍हिडिओ)

'काँग्रेस-राष्ट्रवादीकडून यशवंतरावांच्या स्‍वप्‍नांना तिलांजली' (व्‍हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले. मात्र आजही त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडलेला नाही. त्यांची स्वप्ने आजही अपूर्ण आहेत. आजवर राज्यकर्त्यांनी वेळोवेळी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा चालवत असल्याचे सांगितले. मात्र त्याबाबत कृती केली गेली नाही, असा उल्लेख करत काँग्रेस-राष्ट्रवादीचा नामोल्लेख टाळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टिका केली. 

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा चालवण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. समृद्ध शेतकरी, सामान्य लोकांना न्याय आहे, समाजातील वंचितांना उचित स्थान देण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. हे यशवंतरावांचे स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती अभिवादन यात्रेवेळी दिली.