Mon, Jul 22, 2019 00:55होमपेज › Satara › ‘पुढारी’च्या पाठिंब्यामुळे न्याय मिळाला

‘पुढारी’च्या पाठिंब्यामुळे न्याय मिळाला

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 20 2018 10:54PMपाटण  : प्रतिनिधी 

ज्या भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला व कोयना धरणाची निर्मिती झाली त्याच भूमिपुत्रांची तब्बल साठ वर्षांनंतरही ससेहोलपट सुरूच आहे. या प्रश्‍नावर दै. पुढारीने आवाज उठविला होता. हे अंदोलन सुरू होण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या अन्यायाला वाचा  फोडून शासन दरबारी न्याय मिळवून दिल्याबद्दल प्रकल्पग्रस्तांनी ‘पुढारी’ला धन्यवाद दिले आहेत. 

गेली तेवीस दिवस चाललेल्या या अंदोलनाचे सडेतोड व निर्भीड लिखाण ‘पुढारी’ने केले. याची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली. शासन व प्रशासन ही नमले. ‘पुढारी’मुळे न्याय मिळाला, अशा कृतार्थ भावना कोयना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केल्या. ‘पुढारी’चे आम्ही कायम ऋणी राहू अशा प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्त, जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी दिल्या. तर कृतज्ञता म्हणून श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते पाटण तालुका प्रमुख गणेशचंद्र पिसाळ यांचेकडे दै. पुढारीचे अभिनंदन पत्रही देण्यात आले. प्रलंबीत बहुतेक मागण्या मान्य झाल्याने आंदोलनस्थळी प्रकल्पग्रस्तांनी आनंदोत्सव साजरा केला. 

Tags : satara, satara news, demands, accepted, project affected people, celebrated procession.