होमपेज › Satara › दत्ता पवार यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याची मागणी 

दत्ता पवार यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याची मागणी 

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 11:27PMसातारा : प्रतिनिधी 

दोन वर्षात दोन मुलींवर बलात्कार करण्याचा उद्योग दत्ता पवार यांच्या सुपुत्राने केल्याने मेढा नगरपंचायतीचे नगरसेवक दत्ता पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय करंजेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 

नगरसेवक दत्ता पवार यांनी समाजामध्ये लोकांच्या कामाचा खोटा बुरखा घेवून आपल्या मुलाला कोणताही पायबंद घालण्याचा साधा पयत्न देखील कधीच केला नाही. काही दिवसांपूर्वी जावलीतील एका खेड्यातील मुलीवर संतोष पवार याने बलात्कार केल्याचा गुन्हा मेढा पोलीस ठाण्यात दाखल असताना चार दिवसांपूर्वी सातारा येथे मोबाईलच्या दुकानात कामाला ठेवून सातार्‍यातील एक अबलेवर त्याने बलात्कार केला. त्याला तातडीने शिक्षा करावी, अशी मागणी देखील संजय करंजेकर यांनी केली आहे. 

नगरसेवक दत्ता पवार यांनी मुलाने केलेल्या गुन्हेगारी कृत्याची नैतिक जबाबदारी घेवून नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा तसेच पोलीस यंत्रनेने कोणत्याही दबावाला बळी न पडता निपक्षपातीपणे तपास करुन आरोपी संतोष पवार याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संजय करंजेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.