Wed, Mar 20, 2019 09:09होमपेज › Satara › कराडच्या विमानतळास यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याची मागणी

कराडच्या विमानतळास यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याची मागणी

Published On: Mar 12 2018 2:12PM | Last Updated: Mar 12 2018 2:07PMकराड : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त कराड विमानतळाला "स्व. यशवंतराव चव्हाण विमानतळ कराड" असे नाव देण्यात यावे असे निवेदन संभाजी ब्रिगेडतर्फे प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना देण्यात आले आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष शैलेश मोरे, शहराध्यक्ष भूषण पाटील, मराठा सेवा संघ कराड तालुका अध्यक्ष संभाजी शेडगे, कराड शहर उपाध्यक्ष सागर मोहिते, सचिव विष्णू सावंत, राजेश देसाई यावेळी उपस्थित होते.