Thu, Apr 25, 2019 07:27होमपेज › Satara › पलूस तालुक्यातील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला  

पलूस तालुक्यातील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला  

Published On: Jun 11 2018 10:27AM | Last Updated: Jun 11 2018 10:27AMकराड (जि. सातारा): प्रतिनिधी

कराड तालुक्यातील वडगाव हवेली (जि. सातारा) परिसरात घोगाव (ता. पलूस, जि. सांगली) येथील लालासो लक्ष्मण गोरे (वय ५२) यांचा मृतदेह सोमवारी सकाळी मिळून आला. गोरे हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली असून या माहितीची सत्यता पडताळून पाहिली जात असल्याचे पोलिस निरीक्षक अशोकराव क्षीरसागर यांनी सांगितले आहे. तसेच शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच गोरे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वडगाव हवेलीपासून शेरे-दुशेरे या गावाकडे जाण्यासाठी हुतात्मा दूध डेअरीपासून एक रस्ता आहे. या रस्त्यावर डेअरीपासून सुमारे तीनशे मीटरवर गोरे यांचा मृतदेह एका शेताकडेला असलेल्या नाल्यानजीक मिळून आला आहे. सोमवारी सकाळी शेतात कामासाठी निघालेल्या लोकांना मृतदेह दिल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली.