Sat, Aug 17, 2019 17:12होमपेज › Satara › आधी पुनर्वसन मगच धरण : धरणग्रस्थांचे ठिय्या आंदोलन

आधी पुनर्वसन मगच धरण : धरणग्रस्थांचे ठिय्या आंदोलन

Published On: Jan 18 2018 1:05PM | Last Updated: Jan 18 2018 1:05PM

बुकमार्क करा
पाचगणी : वार्ताहर 

शासन कोणाचे आहे, त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, आमच्या धरणग्रस्थांचे' आधी पुनर्वसन मगच धरण' अशी प्रमुख मागणी करत महू हातगेघर धरणावर महू हातगेघरसह वहागान,  कवडी, काटवली, रईघर, घोटेघर, दापवडी गावतील हजारो धरणग्रस्थांचे महुहातगेघर धरणावर साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे. 

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती अरुणाताई शिर्के, उपसभापती दत्ता गावडे, धरणग्रस्त कृती समितीचे नेते स. म. बेलोशे गुरुजी यासह मोठ्या संख्येने धरणग्रस्त उपस्थित होते.