Fri, Apr 19, 2019 07:59होमपेज › Satara › दै.‘पुढारी’ कस्तुरी क्लबची रविवारी बाईक रॅली

दै.‘पुढारी’ कस्तुरी क्लबची रविवारी बाईक रॅली

Published On: Mar 08 2018 9:12PM | Last Updated: Mar 08 2018 9:00PMसातारा : प्रतिनिधी

दै.‘पुढारी’ कस्तुरी  क्लबच्यावतीने जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून रविवार दि. 11 रोजी कस्तुरी सभासद महिला व युवतींच्या  ढोलताशा पथकासह बाईक रॅलीचे आयोजन  करण्यात आले आहे. ही  रॅली सर्वांसाठी खुली असून सहभागी होणार्‍या महिला व युवतींना  पारंपारिक वेशभूषा करणे आवश्यक आहे.

दै. ‘पुढारी’ने  कस्तुरी क्लबच्या माध्यमातून महिलांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.   त्याद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात येते. यामध्ये विविध वर्कशॉप, प्रशिक्षण कार्यशाळा, सहल, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.  विविध स्पर्धा घेण्यात येतात. प्रत्येक कार्यक्रमामध्ये लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी कस्तुरींना मिळत असते. मनोरंजनात्मक कार्यक्रमाबरोबरच प्रबोधनपर व्याख्यानांचाही लाभ महिलांना मिळत असतो. महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

स्त्रियांना आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने दै. ‘पुढारी’ कस्तुरी  क्लबच्या महिलांना दुचाकी चालवण्याचे मोफत प्रशिक्षिण देण्यात आले होते.  या प्रशिक्षीत झालेल्या महिलांचा आत्मविश्‍वास वाढवण्यासाठी ही बाईक रॅली उपयुक्‍त ठरणार आहे.  कस्तुरी क्लबची महिला बाईक रॅली रविवार दि. 11 रोजी सकाळी 8 वा.  पोवईनाका येथून सुरु होणार असून राजवाडा येथे सांगता होणार आहे.  पोवई नाका येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅलीस प्रारंभ होईल. त्यानंतर राजपथ, शाहू चौक, कमानी हौद, देवी चौक मार्गे ही रॅली राजवाड्यावर जाईल. या बाईक रॅलीसोबतच महिला ढोलताशा पथक असणार आहे. तसेच बाईक रॅलीमध्ये सर्वांना खुला प्रवेश असून सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी तेजस्विनी बोराटे फोन नं. 8805007192 येथे संपर्क साधावा, असे आवाहन ‘दै. पुढारी’  कस्तुरी क्लबच्यावततीने करण्यात आले आहे.