Sun, May 19, 2019 14:36
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › फलटण-दहीवडी रस्त्यावर बस-जीपची धडक  : ९ जखमी

फलटण-दहीवडी रस्त्यावर बस-जीपची धडक  : ९ जखमी

Published On: Jan 05 2018 7:02PM | Last Updated: Jan 05 2018 7:02PM

बुकमार्क करा
फलटण : प्रतिनिधी 

फलटण-दहीवडी रस्त्यावर मोगराळे घाटात पहिल्या वळणावर एसटी बस व वडाप जीप यांची धडक बसून ९ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार,  वडाप जीप (क्र. एमएच ११ एम ३८८) ही फलटणहून दहीवडीकडे जात होती. यावेळी दहीवडीहून फलटणकडे येणार्‍या आटपाडी आगारच्या आटपाडी-पिंपरी चिंचवड एसटी बस (क्र. एमएच १४ बीटी ३३१३) यांची मोगराळे घाटात पहिल्या वळणावर धडक झाली. यामध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत. उशीरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती. जखमींना दहीवडी व फलटण येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.