Tue, Apr 23, 2019 14:15होमपेज › Satara › कोर्टीच्या युवकांनी दिला मायेचा हात

कोर्टीच्या युवकांनी दिला मायेचा हात

Published On: Feb 08 2018 1:54AM | Last Updated: Feb 07 2018 10:55PMउंब्रज :  प्रतिनिधी

सायकलवरून भारत भ्रमण करून व्यसनमुक्तीचा संदेश देणारे व कोर्टी ता. कराड येथील मंदिरात वास्तव करीत असणारे सत्यवान भरत गुरसाळे रा. पलुस ता. सांगली यांचे वयाच्या  75 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. 

नातेवाईकांनी दुर्लक्षित केलेल्या गुरसाळे यांना कोर्टी ता. कराड गावच्या तरूण युवकांनी मायेचा हात दिला होता. दरम्यान भ्रमण करताना गुरसाळे यांना  मिळालेल्या थोड्या थोड्या पैशातून  लाख  हजार  रूपयांची रोख रक्कम व  हजार रूपये किंमतीच्या दोन ठेवपावत्यासह अन्य वस्तू उंब्रज पोलिसांनी  कोर्टी येथील युवकांच्या मदतीने नातेवाईकांना सुपूर्द केल्या.

सायकलवरून भारत भ्रमण करणारे सत्यवान गुरसाळे हे भारत व्यसनमुक्ती शांती यात्रा या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देत होते. सद्य  परिस्थितीला वयाच्या मानाने गुरसाळे यांना प्रकृती साथ देत नसल्याने सातारा ते कराड व कराड ते सातारा सायकलवरून जात असत.  कोर्टी ता. कराड येथील हनुमान मंदिर हे त्यांचे आश्रयस्थान बनले होते. त्यांना गावातील शेखर भिकू थोरात, अतुल अशोक थोरात, अजित लहुराम थोरात यांच्यासह अनेक युवकांनी आपुलकी दाखवित मदतीचा व मायेचा हात दिला होता. गत काही दिवसापूर्वी गुरसाळे हे आजाराने त्रस्त असताना या युवकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्या दरम्यान गुरसाळे यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला मात्र नातलगांनी गुरसाळे यांच्याकडे पाठ फिरवली.  त्या दरम्यान उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. त्यांना सातारा येथील सेवा भावी संस्थेच्या व पोलिस यांच्या मदतीने संगम माऊली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

तरूणांनी सर्व साहित्य युवकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.रोख रक्कम व अन्य साहित्य वारसदारांना देण्याचा निर्णय होऊन सदरची रक्कम  गुरसाळे यांच्या दोन मुली व त्यांची सून यांना उंब्रज पोलीस ठाण्यात देण्यात आली.