Tue, Nov 20, 2018 04:11होमपेज › Satara › सातारा : पसार नवातेला पुन्हा बेड्या

सातारा : पसार नवातेला पुन्हा बेड्या

Published On: Mar 04 2018 12:45PM | Last Updated: Mar 04 2018 12:45PMसातारा : प्रतिनिधी

सातारा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या अट्टल गुन्‍हेगार विसृत नवाते याला पुन्‍हा अटक करण्यात पोलिसांना यश आले. १५ दिवसांपूर्वी नवाते हा पोलिस मुख्यालय परिसरातून पोलिसांना हूल देऊन पळाला होता. आज पुन्‍हा त्याला सातारा स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. 

विसृत नवाते याच्यावर सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे येथे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला अटक करण्यात आले होते. पोलिसांनी पसार झालेल्या नवाते याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू केली आहे.