Mon, Apr 22, 2019 16:40होमपेज › Satara › सातारा : तडीपार गुंडाचा खून

सातारा : तडीपार गुंडाचा खून

Published On: Jul 12 2018 10:40AM | Last Updated: Jul 12 2018 10:40AMसातारा : प्रतिनिधी

साताऱ्यातून तडीपार असलेला गुंड कैलास गायकवाड याचा खून झाला असल्याची माहिती गुरुवारी सकाळी समोर आली आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अर्क शाळेजवळ ही घटना घडली असून, घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, गुरुवारी सकाळी अर्क शाळेजवळ एका युवकाचा मृतदेह पडला असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. परिसरात ही माहिती पसरल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता तो मृतदेह कैलास नथु गायकवाड (वय 26, रा.नामदेववाडी झोपडपट्टी) याचा असल्याचे समोर आले. या दरम्यान त्याच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतल्याने तणाव निर्माण झाला.

कैलास गायकवाड याला डिसेंबर महिन्यात तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीत असतानाही तो साताऱ्यात खुलेआम फिरत होता. आतापर्यंत दोनवेळा त्याने तडीपार आदेशाचे उल्लंघन केले असून चार दिवसापूर्वीच त्याला सातारा तालुका पोलिसांनी उरमोडी धारणाजवळ अटक केली होती.

दरम्यान, कैलासचा खून नेमका कोणी केला? याचा पोलिस शोध घेत आहेत