Sat, Feb 23, 2019 20:20होमपेज › Satara › रिलायन्स जिओ कंपनीवर मेढ्यात गुन्हा

रिलायन्स जिओ कंपनीवर मेढ्यात गुन्हा

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 10:34PM

बुकमार्क करा

सातारा: प्रतिनिधी

पाचवड -कुडाळ-मेढा या राज्य मार्गावर  गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत अनधिकृतरित्या खोदकाम करून सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे 16 लाख रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी रिलायन्स जिओ इन्फोकॅम कंपनी व राजीव अमिडवार (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोेलिसांनी दिलेली माहिती अशी, पाचवड-कुडाळ-मेढा या 40 किलोमीटरच्या राज्य मार्गावरील रस्त्यालगत रिलायन्स जिओ इन्फोकॅम कंपनीकडून ऑप्टीकल फायबर केबल टाकण्याचे काम जून ते डिसेंबर 2017 या कालावधीत सुरू होते. केबलसाठी रस्त्यालगत कंपनीने खोदकाम केले होते. कंपनीने केलेल्या या खोदकामामध्ये 15 लाख 78 हजार 775 रूपयांचे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी फिर्याद दिली आहे. तपास सपोनि जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कदम करत आहेत.