Wed, Nov 21, 2018 12:18



होमपेज › Satara › सातारा : पोलिसाला धक्‍काबुक्‍की करून तडीपार गुंडाचे पलायन

सातारा : पोलिसाला धक्‍काबुक्‍की करून तडीपार गुंडाचे पलायन

Published On: Mar 15 2018 3:15PM | Last Updated: Mar 15 2018 3:15PM



वडूज : वार्ताहर 

तडीपार जयवंत जाधवला पकडताना पोलिसांना धक्काबुक्की करत पुन्हा पलायन केले. याबाबत त्याच्या विरोधात वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वडूज बसस्थानकावर वडूज पोलिस ठाण्याचे कर्मचारी मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करत असताना हद्दपार असलेला जयवंत जाधव हा मोटारसायकलवरती आढळून आला. पोलिस कॉन्‍स्‍टेबल महेंद्र खाडे यांनी त्याच्याकडे हद्दपार असताना कोणाच्या परवानगीने आल्याबाबत विचारपूस केली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तू पोलिस स्टेशनला चल असे म्हणून खाडे यांनी त्यांची मोटारसायकल धरली असता, त्याने खाडे यांना ढकलून देऊन खाली पाडले व तो पळून गेला. या झटापटीत खाडे जखमी झाले आहेत.

अवैद्य धंदा केल्याप्रकारणी तडीपार असलेला जयवंत बजरंग जाधव (रा. वडूज) हा हद्दपार असतानादेखील वडूजमध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिस गेले असता त्यांना ढकलून देऊन जखमी केल्याची तक्रार पोलिस कॉं. महेंद्र खाडे यांनी वडूज पोलिसात तक्रार दाखल केली आहे.घटनेचा तपास पोलीस निरिक्षक यशवंत शिर्के करत आहेत.