Mon, Apr 22, 2019 11:54होमपेज › Satara › कोतवालाचे अपहरण करून मारहाण : वाळू व्यावसायिकाचे कृत्य 

कोतवालाचे अपहरण करून मारहाण : वाळू व्यावसायिकाचे कृत्य 

Published On: Jan 07 2018 8:21PM | Last Updated: Jan 07 2018 8:21PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

वाळू उपशावर कारवाई का करतो? असे म्हणून विरकरवाडी (ता. माण) येथे वाळू माफियांनी कोतवालाला बेदम मारहाण करुन त्याचे अपहरण केले. अपहरण करुन सांगली जिल्ह्यात त्‍यांना घेऊन गेल्‍याने खळबळ उडाली.

तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली असून जखमी कोतवालावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, म्हसवड पोलिसांनी जखमीचा जबाब घेतला असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

कृष्णदेव दत्तात्रय गुजर (रा. राणंद, ता. माण) असे हल्ल्यात जखमी झालेल्या कोतवालाचे नाव आहे. याप्रकरणी विनोद वाघमारे, अमर कोळी, ओमकार कुलकर्णी, सागर सुळे, नितीन मेटकर व एक अनोळखी यांनी मारहाण केली असल्याचा आरोप कोतवालाने केला आहे.

भाजपा पदाधिकार्‍यामुळे सुटका झाली

वाळू माफियांनी गुजर यांना बेदम मारहाण करुन झरे, आटपाडी येथे घेऊन गेले. त्यावेळी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे कारमधून निघाले होते. काहीजण एकाला मारहाण करत असल्याचे अंधारात दिसल्यानंतर पडळकर यांनी कार थांबवली. जखमी अवस्थेतील गुजर यांची अवस्था पाहून त्यांनी चौकशी केली. त्यावेळी गुजर यांनी मदत करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी जखमीला म्हसवडमध्ये आणून सोडण्यात आले.