Sun, Jul 21, 2019 00:15होमपेज › Satara › महाबळेश्वरमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या

महाबळेश्वरमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या

Published On: Apr 15 2018 12:25PM | Last Updated: Apr 15 2018 12:25PMमहाबळेश्वर : वार्ताहर

शहरातील केट्स पॉईंट येथे एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली. अविनाश आनंदा जाधव (वय, 28) आणि तेजश्री रमेश नलावडे अशी आत्‍महत्‍या केलेल्‍या प्रेमी युगुलाची नावे आहेत. 

अविनाश हा सांगली येथील मानसिंग सहकारी बँकेचा कर्मचारी आहे. आत्‍महत्‍या केलेल्‍या प्रेमी युगालाजवळ एक चिट्टी आढळून आली आहे.

Tags :  satara district, mahabaleswar, couple, suicide