Fri, Apr 26, 2019 17:30होमपेज › Satara › लोणंद नगराध्यक्षांच्या विरोधात सत्ताधारी नगरसेवकांचेच उपोषण

लोणंद नगराध्यक्षांच्या विरोधात सत्ताधारी नगरसेवकांचेच उपोषण

Published On: Jan 09 2018 2:52PM | Last Updated: Jan 09 2018 2:52PM

बुकमार्क करा
लोणंद : प्रतिनिधी

लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्नेहलता शेळके - पाटील व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी हे मनमानी कारभार करीत आहेत. असा आरोप करत त्यांच्या निषेधार्थ सत्ताधारीच असणाऱ्या उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके यांच्यासह राष्ट्रवादी व भाजपाच्या सात नगरसेवकांनी जनरल बॉडी सभेतून सभात्याग करीत लोणंद नगरपंचायतीच्या समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यास सुरुवात केली आहे.

लोणंद नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी व भाजप सत्ताधारी असून काँग्रेसचे नगरसेवक विरोधक आहेत . गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत दुफळी निर्माण झाली होती. 

मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास जनरल सभा सुरू झाल्यानंतर मागील प्रोसडिंग कायम करण्याच्या मुद्यावरून नगराध्यक्षा स्नेहलता शेळके - पाटील व उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, बांधकाम सभापती दिपाली क्षीरसागर, पाणी पुरवठा सभापती किरण पवार, नगरसेवक योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके, कुसुम शिरतोडे, कृष्णाबाई रासकर यांच्यात मदभेत झाले. ठराव मंजुरीसाठी मतदान घ्यावे अशी मागणी करण्यात आली. परंतु त्यावर चर्चा न करताच नगराध्यक्षाच्या अधिकारात ठराव मंजूर केला जाऊ लागल्याने या सात  सदस्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या  मनमानी कारभाराच्या निषेधार्थ सभात्याग करून लोनंद नगरपंचायत पोर्च मध्ये एक दिवसाचे लाक्षणीक उपोषणास सुरुवात केली आहे.