Tue, Jun 02, 2020 00:36
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › साताऱ्यात युवकांना कान धरून उठाबशांची शिक्षा (video)

साताऱ्यात युवकांना कान धरून उठाबशांची शिक्षा (video)

Last Updated: Mar 24 2020 10:29AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

साताऱ्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला असून उत्साही युवक मात्र  रस्त्यावर येत आहेत. यावर सातारा पोलिस विविध शक्कल लढवत आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या युवकांना फोकळून काढण्याबरोबरच उठाबशा काढायला लावल्याची एक घटना समोर आली आहे.

सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर पोलिस गस्त घालत असताना काही युवक रस्त्यावर दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता ते टाईमपास करत असल्याचे समोर आले. अखेर पोलिसांनी त्यांना एकमेकांचे कान धरायला लावून उठाबशा काढण्यास सांगितले. युवकांनी मांडीला गोळा येईपर्यंत उठाबशा काढल्यावर त्यांना सोडून देण्यात आले.