Mon, Jul 15, 2019 23:44होमपेज › Satara › शिवप्रतिष्ठान धारकर्‍यांबाबत वादग्रस्त पोस्ट

शिवप्रतिष्ठान धारकर्‍यांबाबत वादग्रस्त पोस्ट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

भीमा - कोरेगाव हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे गुरूजी यांच्या समर्थनार्थ राज्यभर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर ओंड (ता. कराड) येथील एकाने आपल्या फेसबुक अकाऊंटवर या मोर्चांबाबत आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सागर बबन शेवाळे (रा. तुळसण फाटा, ओंड) असे संशयिताचे नाव आहे. बुधवारी भिडे गुरूजी यांच्या समर्थनार्थ सातार्‍यासह राज्यभर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकार्‍यांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मोर्चे काढले होते. या मोर्चानंतर सागर शेवाळे याने भिडे गुरूजींचे माईकवर बोलतानाचे एक छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले आणि त्यासोबतच शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांचा अपमान करणारा, भावना दुखावणारा तसेच समाजात तेढ निर्माण करून दंगलीस चिथावणी देणारा मजकूर फॉरवर्ड केल्याचे पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

बुधवारी रात्री सागर शेवाळे याची ही वादग्रस्त पोस्ट जय साळुंखे नावाच्या एका  व्यक्तीने ‘धारकरी’ नावाच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर स्क्रिन शॉट काढून फॉरवर्ड केली होती. त्यामुळे हा प्रकार शिवप्रतिष्ठानचे कराडमधील कार्यकर्ते सागर आमले यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी गुरूवारी दुपारी कराड शहर पोलिस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. घटनेचे गांभिर्य लक्षात घेत जाधव यांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची सूचना दिल्यानंतर सागर आमले यांच्या तक्रारीवरून सागर शेवाळेविरूद्ध कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Tags : satara, satara news, Facebook Account, controversial post, Shiv Pratinithan activists, 


  •