Tue, Jul 23, 2019 06:25होमपेज › Satara › कराड दक्षिणेत संततधार 

कराड दक्षिणेत संततधार 

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 8:49PMउंडाळेः  वैभव पाटील

गेल्या आठ- दहा दिवसांपासुन पडत असलेल्या संततधार पावसाने कराड दक्षिणच्या डोंगरी विभागातील लहान  मोठे पाझर तलाव, उंडाळे, जिंती, घोंगाव ही मध्यम धरणे भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.  
गेल्या आठ- दिवसापासुन कराड दक्षिणेत पावसाची संततधार सुरू असुन हा पाऊस झीरपणी स्वरूपाचा होता.या पावसाने पडणारे सर्व पाणी जमिनीत मुरूत असल्याने सुरूवातीचे आठ -दिवस जमिनीतुन पाणी बाहेर पडले नाही. पण गत चार- पाच दिवसापासुन विभागात सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याने व जमिनीची भुक भागल्याने डोंगर कपारीतुन छोटे छोटे ओंघळ वाहु लागले व दक्षिणेतील दोन्हीही मांड नदयांना पाणी वाहु लागले या पाण्यामुळे दक्षिणेत या धरणाबरोबर  येणपे, येवती, येळगाव (गोटेवाडी),पाचुपतेवाडी यासह मोठी धरणे मात्र अद्याप भरली नसुन येवती 50 टक्केपेक्षा अधिक पाणी साठा आहे विभागात अजुनही पावसाचा जोर असुन हा जोर असाच राहिला तर येत्या चार ते सहा दिवसात सर्वच धरणे ओव्हरफ्लो होतील असे चित्र आहे.

दक्षिणेत येणपे लोहारवाडी, माटेकरवाडी भुरभुशी यासह धरणेही भरण्याच्या शेवटच्या पातळीवर आहेत. इतर ठिकाणी पावसाचा जोर अधिक असल्याने गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी विभागातील धरणे लवकर भरली आहेत. त्यामुळे शेेतकरीवर्ग समाधानीआहे.