Sun, May 19, 2019 14:17
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › फलटणमध्ये कोळकी हद्दीत कंटेनर पलटी, चालक जखमी

फलटणमध्ये कोळकी हद्दीत कंटेनर पलटी, चालक जखमी

Published On: Jan 24 2018 9:32AM | Last Updated: Jan 24 2018 9:32AMफलटण : प्रतिनिधी

सांगोल्‍यावरून वाशी मुंबईकडे डाळिंब घेऊन जाणारा कंटेनर कोळकी हद्दीतील राव रामोशी पुलावर पलटी झाला. या अपघातात चालक गंरीर जखमी झाला आहे.  त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. कौसर नासिर मिया आलम (वय 28 रा. झारखंड) असे जखमी झालेल्‍या चालकाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  बुधवारी सकाळी ८ वाजता ( एमएच - 46- एच - 3429) डाळिंब घेऊन जाणाऱ्या कंटेनरच्या मागील चाकाचा वळणावर एक्सल तुटल्याने  कंटेनर साईडच्या बरेकेटवर पलटी झाला. यामध्ये कंटेनरच्या  समोरील भागाचा  चक्काचूर झाला आहे. तर, डिझेल टँक फुटला आहे. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्‍थानिकांनी घटनास्‍थळी धाव घेत चालकाचाल उपचारासाठल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.