Wed, Apr 24, 2019 01:31होमपेज › Satara › वणव्यामुळे ६ वर्षात साडेअठरा लाखांचे नुकसान 

वणव्यामुळे ६ वर्षात साडेअठरा लाखांचे नुकसान 

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 8:25PMसातारा : प्रविण शिंगटे

सातारा जिल्ह्यात गेल्या 6 वर्षात 3 हजार 82.15 हेक्टर क्षेत्रावरील वनक्षेत्राला वणवा लागल्याने सुमारे 18 लाख 46 हजार 385 रुपये किंमतीच्या वनसंपदेची हानी झाली असून वणवणव्याबाबत वन विभागामार्फत 477 अज्ञातांवर  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सातारा  जिल्ह्यात सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, जावली, खंडाळा, कोरेगाव, फलटण, खटाव, माण अशा 11 तालुक्यात  सुमारे 1 लाख 18 हजार 174.62 हेक्टर वनक्षेत्र आहे. या वनालगत  असणार्‍या 825 गावांमध्ये वनविभागाच्यावतीने संयुक्त वन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आहे. या समित्यामार्फत वनाचे संरक्षण केले जाते, मात्र अनेकदा वणव्याच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत असताना दिसत आहेत. वनालगत असणार्‍या गावामध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत जनजागृती करण्यात येते. वणव्यापासून वाचवू   या आपले जंगल, वनवणव्यामुळे वनांचे आतोनात नुकसान होते. आगीत वनातील अनेक गोष्टी नष्ट होत असल्याने प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या उपजीविकेवर त्याचा वाईट परिणाम होतो. वन्य प्राण्याचा निवारा, पाणी नष्ट झाल्याने हे वन्य प्राणी गावांकडे वळत असतात. यासाठी वनवणव्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. 

सातारा जिल्ह्यात गेल्या सहा वर्षात जंगल व डोंगराना वणवे लावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सन 2013 साली  सुमारे 421.63 हेक्टर क्षेत्रावरील  वनक्षेत्राला वणवा लागल्याने सुमारे 2 लाख 45 हजार रुपयांच्या वनसंपदेची हानी झाली. सन 2014 साली  सुमारे 366 हेक्टर क्षेत्रावरील  वनक्षेत्राला वणवा लागल्याने सुमारे 7 लाख 3 हजार 610 रुपयांच्या वनसंपदेची हानी झाली.

सन 2015 साली  सुमारे 165.5 हेक्टर क्षेत्रावरील  वनक्षेत्राला वणवा लागल्याने सुमारे 36 हजार 650 रुपयांची वनसंपदेची हानी झाली.सन 2016 साली  सुमारे 875.92 हेक्टर क्षेत्रावरील  वनक्षेत्राला वणवा लागल्याने सुमारे 2 लाख 82 हजार 850 रुपयांची वनसंपदेची हानी झाली. सन 2017 साली  सुमारे 1 हजार 184.75 हेक्टर क्षेत्रावरील  वनक्षेत्राला वणवा लागल्याने  सुमारे 5 लाख 45 हजार 775 रुपयांची वनसंपदेची हानी झाली 

सन 2018 साली आतापयर्ंंत 68.8 हेक्टर क्षेत्रावरील वनक्षेत्राला वणवा लागल्याने सुमारे 32 हजार 500 रुपयांची वनसंपदेची हानी झाली. जिल्ह्यात पाच वर्षात सुमारे 3 हजार 82.15 हेक्टर क्षेत्रावरील  वनक्षेत्राला वणवा लागल्याने सुमारे 18 लाख 46 हजार 385 रुपयांच्या वनसंपदेची हानी झाली.  477 अज्ञातांवर वन विभागाच्यावतीने  गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे अज्ञात व्यक्तींनी लावले असल्याने हे गुन्हे निकाली काढण्यात आल्याची माहिती वनविभागामार्फत देण्यात आली. निसर्गातील वनसंपदेचे रक्षण होण्यासाठी प्रशासनाने आणखी कठोर कायदे आणण्याची गरज आहे. तरच वनसंपत्तीचे जतन होईल.