Wed, Apr 24, 2019 11:53होमपेज › Satara › सातारा : शांतीदूत पुनर्स्थापनेस सुरूवात (Video)

सातारा : शांतीदूत पुनर्स्थापनेस सुरूवात (Video)

Published On: Feb 14 2018 1:17PM | Last Updated: Feb 14 2018 1:17PMसातारा : प्रतिनिधी

पोलिस मुख्यालयासमोरील शांतीदूत पुन्हा आहे त्याच ठिकाणी बसविण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे सातारकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शांतीदूत पुन्हा त्याच जागी दिसणार याचा आनंद मिठाई वाटून साजरा करण्यात आला.  

शांततेचे प्रतीक असलेला पोलिस मुख्यालयासमोरील कबुतराचा पुतळा वाहतुकीला अडथळा येतो म्हणून हटवण्यात आल्यानंतर ‘पुढारी’ने घेतलेली ‘रोखठोक’ भूमिका व त्यानंतर  सातारकरांनी दाखवलेल्या आक्रमकतेचा विचार करून सातारा पोलिस दलाने लोकभावनेचा आदर करत कबुतराचा पुतळा होता त्याच जागेवर पुनर्स्थापित निर्णय घेतला होता. त्यानुसार आज शांतीदूत पुनस्थापित करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली.