होमपेज › Satara › सामूहिक अत्याचार; चौघांवर गुन्हा

सामूहिक अत्याचार; चौघांवर गुन्हा

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 03 2018 11:16PM



सातारा :  प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला लग्‍नाचे आमिष दाखवून तसेच त्यानंतर त्या मुलीशी लुटुपुटुचे लग्‍न करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका खासगी क्‍लासच्या संचालकासह चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. क्‍लासचालक समीर बाळासाहेब मुजावर (रा. सय्यद कॉलनी, करंजे नाका, सातारा), दिशान आतार (रा. शाहूपुरी), इब्राहिम व आपटे (पूर्ण नावे माहीत नाहीत) अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या वर्षी संबंधित पीडितेने लैंगिक शोषण झाल्याबाबतची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली होती. यानंतर सातारा शहर पोलिसांनी संबंधित आरोपीच्या विरोधात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी संबंधित पीडित मुलगी अल्पवयीन होती. त्याचबरोबर संशयित आरोपीचे पहिले लग्‍नही झाले होते. त्यावेळी संबंधित पीडितेच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांना भेटून लव्ह जिहादची तक्रार केली होती. त्यामुळे सातार्‍यातील सामाजिक वातावरण गढूळ झाले होते. परंतु पोलिसांनी यामध्ये सुवर्णमध्य साधून हा विषय संपवला होता. मात्र यानंतर यातील संशयित आरोपी समीर बाळासाहेब मुजावर, दिशान आतार, इब्राहिम व आपटे या चौघांनी यानंतर संबंधित अल्पवयीन मुलीचे खोटे लग्न करुन तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

समीर मुजावर याच्याकडे संबंधित पीडित  मुलगी शिकवणीसाठी येत होती. यावेळी समीर  मुजावर याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याबरोबर खोटेनाटे लग्न करुन त्याचे मोबाईल चित्रीकरण केले. त्यानंतर संबंधित चौघांनी पीडितेवर वेळोवेळी विविध ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याबाबतची तक्रार संबंधित पीडितेने व तिच्या कुटूंबियांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात केली आहे. याबाबत चौघांवरही बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बे्ंरदे करीत आहेत.

Tags : Satara, common, atrocity, torture, Crime, Fours