Tue, Jul 23, 2019 06:18होमपेज › Satara › ४५ दूध संकलन केंद्रे, डेअर्‍यांवर धाडी

४५ दूध संकलन केंद्रे, डेअर्‍यांवर धाडी

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 10:27PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 45 घाऊक विक्रेते, डेअर्‍या व दूध संकलन  केंद्रांवर अन्न, औषध विभागाने धाडी टाकून  दुधाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. दुधामध्ये भेसळ होत असल्याचा संशय आल्याने अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी ही कारवाई केली असून दुधात दोष सापडणार्‍या संस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुधात प्रचंड भेसळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे भेसळीचे मूळ असणार्‍या दूध संकलन केंद्रांची तपासणी करावी, अशी मागणी होत होती. अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्‍त राजेंद्र रुणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी  दत्‍ता साळुंखे, राजेंद्र काकडे, युवराज ढेंबरे, राहूल खंडागळे, रुपाली खापणे, मेघना पवार यांनी जिल्ह्यात मोहिम राबवली. अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील काही तालुक्यांतील घाऊक विक्रेते, डेअर्‍या व दूध संकलन  केंद्रांकडील दूधाचे नमुने ताब्यात घेतले. त्यामध्ये मे. वेण्णा मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., वाढे, मे. संकल्प मिल्क चिलींग सेंटर जुनी एमआयडीसी सातारा, मे. हुतात्मा सहकारी दूध उत्पादक संघ लि. वडगाव हवेली, मे. सुमन मिल्क अ‍ॅण्ड मिल्क, गोवारे, मे. बालाजी एंटरप्रायझेस सातारा, मे. भैरवनाथ दूध संकलन केंद्र पसरणी, मे. ज्ञानेश्‍वरी दूध संकलन केंद्र परकंदी, मे. कोयना अ‍ॅण्ड कृष्णा मिल्क एजन्सी वाई, मे. सात्विक मिल्क प्रॉडक्ट्स खामगाव, मे. स्वाभिमानी दूध उत्पादक मंडळ तडवळे-फलटण, मे. भैरवनाथ दूध उत्पादक मंडळ खामगाव, मे. कृष्णराज डेअरी अ‍ॅण्ड डेअरी प्रॉडक्ट्स फडतरवाडी, मे. सोनाई चिलींग सेंटर मोही, मे. आदित्य दूध संकलन केंद्र औंध, मे. जयहरी दूध संकलन अ‍ॅण्ड शीतकरण केंद्र राणंद, मे. पृथ्वीराज रियल क्‍वॉलिटी मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. बनपुरी, मे. मयुरेश्‍वर दूध संकलन अ‍ॅण्ड शीतकरण कवठे, मे. पश्‍चिम महाराष्ट्र मिल्क फुड प्रॉडक्ट्स चिमणगाव, मे. कृष्णामाई डेअरी जुनी एमआयडीसी सातारा, मे. शिवराज दूध संकलन केंद्र धामणी, मे. नॅचरल डिलाईट डेअरी अ‍ॅण्ड डेअरी प्रॉडक्ट्स पळशी, मे अनंत दूध प्रा. लि. आनेवाडी अशा 45 संस्थांच्या दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. दुधाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.  दुधाचे नमुने घेण्याचे काम यापुढेही सुरुच राहणार आहे. दूध भेसळीबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी कार्यालयाशी  संपर्क साधावा असे आवाहन आयुक्‍त  राजेंद्र रुणवाल यांनी केले आहे.