कुडाळ : प्रतिनिधी
शाळेच्या आवारात भाजी मंडईची लगबग, ‘भाजी घ्या भाजी’ चा आरडाओरडा, गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लृप्त्या हे सगळे कुडाळ (ता. जावळी) येथे महाराजा शिवाजी हायस्कूलमध्ये घडून आले. येथील विद्यार्थ्यांनी शाळेतच आठवडा बाजार भरवला होता. यावेळी गावातील नागरिकांनी शाळेत येऊन बाजारातील पालेभाज्या खरेदी केल्या. कुडाळ परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या शेतातील भाजी-पाला बाजारात न जाता थेट शाळेत भरवलेल्या बाजारातच विकायला आणल्यामुळे शाळेत आठवडी बाजाराचे वातावरणच तयार झाले होते.