Wed, Nov 14, 2018 23:17होमपेज › Satara › पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू

पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 11:23PMसातारा : प्रतिनिधी

सातारारोड, ता. कोरेगाव येथे सोमवारी दुपारी पोटपाटालगत खेळत असताना विकास सदाशिव लोखंडे (वय 6, मूळ रा. वीरकरवाडी, ता. माण, सध्या रा. सातारारोड) या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, विकासचे आई-वडील उसतोड कामगार असून सध्या सातारारोड परिसरात उसतोडीचे काम ते करत आहेत. सोमवारी दुपारी विकास हा पोटपाटालगत खेळत होता. खेळता-खेळता तो पाण्यात पडल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे परिसरातील नागरिकांनी  घटनास्थळी धाव घेतली. विकासला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, विकासचा मृत्यू झाला असल्याचे समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.\

 

Tags : satara, satara news, drown, child death,