Tue, Mar 19, 2019 03:35होमपेज › Satara › पाटण बाजार समिती सभापतींवर अविश्‍वास 

पाटण बाजार समिती सभापतींवर अविश्‍वास 

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 21 2017 12:23AM

बुकमार्क करा

मारूल हवेली : वार्ताहर

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह बाळासाहेब पाटणकर (विक्रमबाबा) यांच्या विरुद्धचा अविश्‍वास ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे पाटणच्या राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. 

पाटण कृषी उत्पन्न बाजार  समितीवर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे वर्चस्व आहे. बाजार समिती  सभापतिपदी विक्रमबाबा पाटणकर यांची वर्णी लागली होती; मात्र विक्रमबाबा हे सदस्यांना विश्‍वासात न घेता परस्पर कामकाज करत असल्याने संचालकांमध्ये नाराजीचा सूर होता. बाजार समितीच्या 14 संचालकांनी त्यांच्या विरुद्ध अविश्‍वास ठराव घेण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्याकरिता  जिल्हा उपनिबंधक संस्थेकडे मागणी केली होती. त्यानुसार मल्हारपेठ येथील बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात बुधवारी दुपारी 12.30  वाजण्याच्या सुमार ही विशेष सभा घेण्यात आली. 

यावेळी सभापती विक्रमबाबा पाटणकर, उपसभापती दादासो यादव, संचालक अरविंद जाधव, अधिक माने, सुहास माने, राजाराम मोरे, सुभाष पाटील, सौ. रेखा पाटील, शहाबाई यादव, शंकर संकपाळ, श्रीरंग मोहिते, अभिजीत जाधव, उत्तम जाधव, आनंदा डुबल, सिताराम मोरे, रामदास कदम, शरद राऊत व आनंदराव पवार यांची उपस्थिती होती. सभेत हा अविश्‍वास ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान मध्येच विक्रमबाबा पाटणकर सभा सोडून निघून गेले. सभेचे अध्यक्ष अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक संजय पवार यांनी काम पाहीले.