Mon, Mar 25, 2019 04:56
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › विक्रमसिंह पाटणकर यांचा आज नागरी सत्कार 

विक्रमसिंह पाटणकर यांचा आज नागरी सत्कार 

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 10:43PM

बुकमार्क करा

चाफळ : वार्ताहर

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा 74 वा वाढदिवस व अमृतमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ चाफळ येथे आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दि.27 रोजी दुपारी 3 वाजता चाफळ येथील श्रीराम मंदिरासमोर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा होत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार व विक्रमसिंह पाटणकर अमृत महोत्सव समिती म्हवशी जिल्हा परिषद मतदारसंघ यांच्यावतीने देण्यात आली.

बुधवार दि 27 रोजी दुपारी 3 वाजता अजित पवार यांच्या हस्ते विक्रमसिंह पाटणकर यांचा पाटण विधानसभा मतदारसंघाच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायतीचे पदाधिकारी यांच्याही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक- निंबाळकर खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भ़ोसले, खा. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आ. मकरंद पाटील, आ. नरेंद्र पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निबाळकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शेती सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगौड, महिला व बालकल्याण सभापती सौ. वनिता गोरे, कराड जनता बँकेचे चेअरमन राजेश पाटील-वाठारकर, टाटाचे कामगार नेते सुजित पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील सर्वांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कसे आवाहन राजेश पवार व विक्रसिंह पाटणकर अमृत मह़ोत्सव समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.