Mon, May 27, 2019 06:41होमपेज › Satara › जोशीविहीरजवळ कार, रिक्षा अपघातात चार जण गंभीर

जोशीविहीरजवळ कार, रिक्षा अपघातात चार जण गंभीर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ओझर्डे : वार्ताहर

जोशीविहीर उड्डाणपुलाच्या उतारावर भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट कारने पुढे असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरात धडक दिल्याने रिक्षातील 4 जण गंभीर जखमी झाले. 

ठाणे येथून तानाजी जगन्नाथ जाधव वय 45, जयश्री विजय महाडिक वय 38, गणेश संतोष जाधव वय 15, कल्पना तानाजी जाधव वय 30, पायल तानाजी जाधव वय 17 असे सर्वजण खराडे ता. कराड या आपल्या मूळ गावी यात्रेला आणलेली नवी रिक्षा पुजायला घेवून चालले होते.  त्यांची रिक्षा सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जोशीविहीर येथील उड्डाणपुलावर आली असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कार (क्र. एमएच 01 बिटी 9233 हिने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षातील सर्वजण बाहेर फेकले गेल्याने सर्वजण गंभीर जखमी झाले.

धडक इतकी भीषण होती की  पाठीमागून धडक दिल्यानंतर स्विफ्ट कार पुढे जावून थांबली असता पाठीमागून पुन्हा मोकळी रिक्षा उभ्या असलेल्या स्विफ्ट कारवर जोरदार आदळली. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती भुईंज पोलीस स्टेशनला कळताच सहायक फौजदार बाबर हे घटना स्थळावर दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस स्टेशनला झाली.

Tags : satara news, car, rickshaw, accident, Four people injured, Near Joshi well,


  •