Tue, Mar 19, 2019 21:10होमपेज › Satara › सातारा : लोणंदजवळ कार अपघात दोन ठार

सातारा : लोणंदजवळ कार अपघात दोन ठार

Published On: Apr 17 2018 8:23AM | Last Updated: Apr 17 2018 8:23AMलोणंद : प्रतिनिधी 

लोणंद-फलटण रस्‍त्यावर तरडगाव हद्दीत पालखी तळाजवळील भोर ओढ्याच्या पुलावर भीषण कार अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर चौघे गंभीर जखमी आहेत. आज (दि. १७) रोजी रात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. मृत पाडेगाव व जेऊर येथील असून बुध डिस्‍कळ येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीवरून परतत होते.

पाडेगाव व जेऊर येथील धुमाळ कुटुंबीय आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी स्‍वीफ्‍ट कारमधून बुध डिस्‍कळ येथे गेले होते. अंत्यविधीवरून परतताना तरडगावजवळ भोर ओढ्यावर गाडी आली असता चालकाचा ताबा सुटून गाडी दुभाजकाला धडकली. यामध्ये संजय शिवाजी धुमाळ (वय ४३) रा. मांडकी ता. पुरंद व शोभा नंदकुमार धुमाळ (वय ४५) रा. पाडेगाव ता. फलटण यांचा जागीच मृत्यू झाला. 

तसेच या अपघातात सारीका संजय धुमाळ, कमल दगडू धुमाळ व अन्य दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर लोणंद येथील खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सहाय्‍यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यासह सहकार्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. पुढील तपास लोणंद पोलिस करीत आहेत. 

Tags : satara, satara news, car accident,