Sat, Jan 19, 2019 11:39होमपेज › Satara › पाटण : वन्यप्राणी निरिक्षणासाठी लावलेले कॅमेरेच चोरीला

वन्यप्राणी निरिक्षणासाठी लावलेले कॅमेरेच चोरीला

Published On: Jun 18 2018 8:17PM | Last Updated: Jun 18 2018 8:17PMपाटण : प्रतिनिधी 

कोयना विभागात वन्य प्राण्यांच्या निरिक्षणाकरीता जंगलात लावण्यात आलेले दोन कॅमेरे चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याबाबत वनरक्षक संदिप जोशी यांनी कोयनानगर (ता. पाटण, जि. सातारा) पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोयना विभागात असलेल्या वन्यप्राण्यांच्या निरिक्षणाकरीता कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात ठिकठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यापैकी मळे व कोळणे येथे लावण्यात आलेले दोन कॅमेरे अज्ञात चोरटय़ांनी चोरून नेले. या चोरीबाबत कोयनानगर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविला असून याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार नामदेव साळुंखे करीत आहेत.