Thu, Feb 21, 2019 03:53होमपेज › Satara › तलवारीने केक कापल्या प्रकरणी गुन्हे दाखल

तलवारीने केक कापल्या प्रकरणी गुन्हे दाखल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा शहर परिसरातील सदरबझार येथे दि.30 रोजी मध्यरात्री तलवारीने केक कापून, फटाके वाजवत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी 50 ते 60 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत आणखी एक असाच गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सहाय्यक फौजदार श्रीधर एकनाथ पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते शहर पोलिस ठाण्याच्या सदरबझार चौकीत कार्यरत आहेत. श्रीधर पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 30 रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सदरबझार येथील भारतमाता चौक ते सैनिक नगर या रस्त्यावर सुमारे 50 ते 60 अनोळखींनी गर्दी केली होती. यावेळी संशयितांनी वाढदिवसानिमित्त फटाके वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केला.

संशयितांनी गोंधळ घालत धारदार तलवारीसारखे शस्त्र काढून वाढदिवसानिमित्त केक कापला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर परिसरात पोलिस गेले असता संशयित तेथून पसार झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रविवारी दुपारी उशिरा पवार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, अशाच पध्दतीने सातारा शहरात आणखी एका ठिकाणी बेकायदा जमाव जमवून तलवारीसारख्या धारदार शस्त्राने केक कापल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

तलवारीने केक कापल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचे सत्र अवलंबल्याने सातार्‍यात खळबळ उडाली आहे. गुन्हे दाखल करत असताना जेव्हा-जेव्हा केक कापले गेले त्यावेळचे व्हिडीओ शुटींग, फोटो मिळवण्याची प्रक्रिया पोलिसांची सुरु आहे.

Tags : cake, cutting, Sword, Filing, complaints, satara news    


  •