Sat, Mar 23, 2019 02:15होमपेज › Satara › सातारा : खटावमध्ये भीषण अपघातात आठजण जखमी (व्‍हिडिओ)

सातारा : खटावमध्ये भीषण अपघातात आठजण जखमी (व्‍हिडिओ)

Published On: Dec 08 2017 7:06PM | Last Updated: Dec 08 2017 7:06PM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी

खटाव-वडूज रस्त्यावरील जाधव लवन या ठिकाणी लक्झरी बस आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक झाली. यामध्ये आठजण जखमी झाले. या  अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. 
शुक्रवारी  सकाळी आठ वाजता खटावहून वडूजकडे जाणारी लक्झरी ( एमएच ११ बीएल ९३९९ ) आणि वडूजकडून खटावकडे येणारी स्कॉर्पियो ( एमएच ११ एके  २५२६ ) या दोन गाड्यांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात स्कॉर्पियो चालक अक्षय धुमाळ, लक्झरी बसचालक नामदेव काळे यांच्यासह स्कॉर्पियोतील सहा महिला जखमी झाल्या. जखमींना वडूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर दोन्ही वहाने रस्त्यावरुन खाली गेली.